रोट्रॅक्ट क्लब ऑफ जळगावचा स्तुत्य उपक्रम

0

जळगाव : गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने घेतला प्रश्नमंजुषा कार्यक्रम. रोट्रॅक्ट क्लब जळगाव आयोजित प्रश्नमंजुषा ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरातील भाऊंचे उद्यान येथे रोट्रॅक्ट क्लब ऑफ जळगाव ने गांधीजी व शास्त्रीजी यांच्या जयंती निमित्ताने प्रश्नमंजुषा हा उपक्रम राबविला. गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या आयुष्यवरील २००प्रश्न विचारात त्यांच्या जीवन चर्येवर उजाळा टाकला.

या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोट्रॅक्ट कडून जयवर्धन नेवे व संकेत नेवे यांनी नागरिकांना प्रश्न विचारले. तसेच ज्यांचे उत्तर बरोबर असेल त्यांना क्लब कडून छोटीसी भेट वस्तू देखील देण्यात आली. या उपक्रमा नंतर नागरिकांकडून सतत अश्या प्रकारचे उपक्रम क्लब कडून राबवावे अशी मागणी नागरिकांकडून होत होती. ह्या उपक्रमासाठी रोट्रॅक्ट प्रमुख जयवर्धन नेवे, अध्यक्ष आशना तडवी, सचिव पूजा गजरे, राजश्री नेवे,आदित्य वाणी,ईशवर पाटील,कृनाल सोनार,प्रितेश जैन,संकेत नेवे, तिलक लद्धा, देवेश दोषी, शुभम राजपूत आदी उपस्थित होते.

Copy