रोटरॅक्ट क्लबतर्फे 60 वाहतूक पोलिसांचा सत्कार

0

जळगाव । रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव आणि रोटरॅक्ट क्लब आय.एम.आर. यांच्यावतीने सुरक्षित वाहतुक सप्ताहातंर्गत उत्कृष्ठ कामगिरी बजाविणार्‍या वाहतुक शाखेतील 60 पोलिसांचा सत्कार करण्यात आला. गणपतीनगरमधील रोटरी हॉलमध्ये वाहतुक सप्ताह निमित्ताने वाहतुक शाखेतील पोलिसांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वाहतुक शाखेतील उत्कृष्ट कामगिरी, उत्तम सेवा, प्रसंगावधान राखून चोरांना पकडणे अशा कामगिरी बजाविलेल्या 60 पोलिस कर्मचार्‍यांचा रोटरॅक्टच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

यांची होती कार्यक्रमात उपस्थिती
यावेळी आमदार राजुमामा भोळे, उपमहापौर ललीत कोल्हे, वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, रोटरॅक्टचे जिल्हा प्रतिनिधी जयवर्धन नेवे उपस्थित होते. अमृत मित्तल, दृष्टी सोनी यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष पारस जैन, आय.एम.आर. अध्यक्ष राजश्री सावकारे, आशना तडवी, तरूण अरतानी, अफाक मेमन, आयुष मणियार, प्रितेश जैन, असुदिप पाटील, भावना जैन, रुपेश पाटील, शिवानी मोहीते, अक्षय अग्रवाल, गायत्री भोईटे, अनिकेत बदलानी आदींचे सहकार्य लाभले.