रोटरी क्लबतर्फे ‘बीव्हीजी’चे गायकवाड यांचे व्याख्यान

0

जळगाव। येथील रोटरी क्लबतर्फे शुक्रवार 7 एप्रिल रोजी कांताई सभागृहात सायंकाळी 6 वाजता बीव्हीजी अर्थात भारत विकास गृपचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांचे कल्पनेपलिकडचे यश या विषयावर जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व रोटरी डिस्ट्रीक्ट 3030 चे प्रांतपाल महेश मोकलकर यांची उपस्थिती राहणार आहे. जाहिर व्याख्याना आधी गणपती नगरातील रोटरी हॉल येथे दुपारी 3 वाजता गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रगती व प्रयोगशील सेंद्रीय शेती करणार्या व्यक्तीसाठी शाश्वत शेती विकास या विषयावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या जाहिर व्याख्यान व शेतकरी मेळाव्यास उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष नित्यानंद पाटील व मानद सचिव विजय जोशी यांनी केले आहे.