रोटरी क्लबतर्फे कुमरेजला होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप

0

शिंदखेडा: तालुक्यातील कुमरेज गावातील दिडशे कुटुबांना घरोघरी जावून आयुष्य मंत्रालयाने सुचविलेले कोरोना प्रतिबंधक (रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ) होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्यांचे रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा यांच्यातर्फे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी प्रोजेक्ट चेअरमन डॉ.सुजय पवार यांनी कोरोना महामारी विषयावर जनजागृती करून मार्गदर्शन केले. त्यात 150 गोळ्यांचे किट वाटप केलेत.

रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण बोरसे यांनी कोरोना संकटावरील उपायांसाठी पाचसूत्री योजना समजावली व ह्या औषधांचे महत्व स्पष्ट करून गावातील प्रत्येक नागरिकापासून आबालवृद्धपर्यंत सर्वांनी या गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन केले.

नागरिकांची सुरक्षितता राखली जावी, नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढुन या आजारापासून ते बचावले जावे, तसेच कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने अधिकृत केलेले होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्या रोटरी क्लबच्यावतीने हितेंद्र जैन, संदीप सोनार, संदीप गिरासे, देवेन्द्र नाईक, गोपालसिंह परमार यांनी गोळ्यांचे वाटप केले.

यावेळी सत्तारसिंग गिरासे, मंगलसिंग गिरासे, पोलीस पाटील प्रदीप गिरासे यांचे सहकार्य लाभले.प्रास्ताविक सचिव विकी चंदनानी तर आभार संजय महाजन यांनी मानले.

Copy