रोटरी क्लबच्या वतीने गरजूंना शिलाई मशीन वाटप

0

शिंदखेडा – येथील रोटरी क्लब कडून शहरातील 20 गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन चे वितरण रोटरीचे डीआरएफसी आशिष अजमेरा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर मशिन हे रोटरीच्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत वाटण्यात आले. रोटरी क्लब ऑफ शिंदखेडाने, रोटरी इंटरनॅशनलच्या महिला सशक्तीकरण (woman Empowerment project)उपक्रमा अंतर्गत सदर मशीन, गरीब, गरजू महिलांना उपलब्ध करून दिलेत. सदर उपक्रम हा मागील वर्षांचे अध्यक्ष हर्षल अहिरराव, सेक्रेटरी देवेंद्र नाईक, प्रोजेक्ट चेअरमन विकी चंदनानी, यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लबचे नुतन अध्यक्ष प्रदिप गिरासे, सचिव सुनिल मोरे, बाळकृष्ण बोरसे, हितेंद्र जैन, संजय पारख, संदिप सोनार, विनोद जैन, मयुर ओसवालसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Copy