Private Advt

रोटरीतर्फे शिबिरात 28 दात्यांचे रक्तदान

नंदुरबार। येथील नगरपालिका शाळा क्र.4 मध्ये रोटरी क्लब नंदनगरी आणि छत्रपती ब्लड फाउंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. शिबिरात खासगी प्राथमिक, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व शिक्षिका अशा 28 दात्यांनी रक्तदान केले.अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण होते.

 

प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, छत्रपती ब्लड फाउंंडेशनचे संस्थापक जीवन माळी, कौटिल्य फाउंंडेशनचे प्रवीण पाटील, रोटेरियन राहुल पाटील होते. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सूत्रसंचालन करण चव्हाण, शशिकांत पाटील तर सचिव अनिल शर्मा यांनी आभार मानले.