Private Advt

रोझोद्यात 6 वर्षीय बालिकेचा मृत्यू

खेळत असताना चिमुकली पडली गोबर गॅस टाकीत : रोझोदा गावासह परीसरात हळहळ

सावदा : येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे सहा वर्षीय मुलीचा गोबर गॅसच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. परी पुष्कर फेगडे (वय 6) असे मयत बालिकेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता परी खेळत असताना गोबर गॅसच्या कुंडाजवळ पोहोचल्यानंतर त्यात पडली मात्र कुंड खोल असल्याने व दुपारची वेळ असल्याने ही घटना तत्काळ लक्षात आली नाही. बराच वेळ होवूनही परी दिसत नसल्याने तिचा शोध घेत असता ही घटना उघडकीस आली. मयत परी ही जे.टी.महाजन शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होती. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परीवार आहे. घटनेने रोझोदा गावात शोककळा पसरली. मयत परी ही लक्ष्मण ज्ञानदेव फेगडे यांची नात होय.