रोझोद्यात तरुणाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट : सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

सावदा : तालुक्यातील रोझोदा येथील 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवार, 2 रोजी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.प्रशांत वासूदेव मेढे (21, रा.रोझोदा, ता.सावदा) असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रशांत मेढे हा तरूण रात्री कुटुंबियासह जेवण करून 11 वाजता झोपायला गेला. दरम्यान 11 ते मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्याने तरूणाने राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी मयताचे वडील वासुदेव धनजी मेढे यांच्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्यात आई, वडील, बहिण असा परीवार आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुरेश अढायंगे करीत आहेत.

Copy