रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार होणार उपलब्ध

0

रावेर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताचे काम बंद झाले आहे . रोजगार हमी योजनेंतर्गत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. गरजूंनी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.

बैठकीत कोरोनाविषयी चिंतन
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . सुदैवाने रावेर तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही मात्र येणारा पुढील माहिना महत्वाचा आहे. यात बाहेरगावाहून आलेल्या नागरीकांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या काळात हातमजूरांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ आली आहे. सोमवारी तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे म्हणजे हाताला काम मिळाल्यानंतर त्यांची उपासमारी होणार नाही. शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाच्या हाताला काम मिळावे यासाठी ग्रामपातळीवरील सरपंच आणि उपसरपंच यांची नेमणूक केली आहे . समितीत समन्वय साधण्यासाठी याचा उपयोग होणार आहे तसेच पालक अधिकारी च्या माध्यमातून उद्धभवलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न राहणार आहे. बाहेरून आलेल्या तरुण व नागरीकांनी स्वत:हून घरातच वेगळ्या खोलीत विलीगीकरण व्हावे जेणेकरून कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे. रावेर, यावल, फैजपूरच्या जनतेला नागरीकांना रोजगार मिळविण्यासाठी प्रशासनाशी थेट संपर्क करण्याचे अवाहन केले आहे. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे, रावेर पालिका मुख्यधिकारी रवींद्र लांडे आदी उपस्थित होते.

Copy