रोजगार बंद झाल्याने दिव्यांगांना द्यावा पाच टक्के निधी

0

फैजपूर : कोविड 19 (करोना) या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात, राज्यात तसेच जिल्ह्यात प्रशासनाने लॉकडाऊन करण्यात आल्याने कोणत्याही परीस्थितीत दिव्यांग व्यक्तीस घराबाहेर निघता येत नाही शिवाय अनेकांचे रोजगार बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. यात मुख्यत्वे करून दिव्यांग बांधवांचे खुप हाल होत आहेत. यासाठी फैजपूर नगरपरीषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक खाद्योपयोगी वस्तू (गहू, तांदूळ, साखर, तेल तत्सम आदी वस्तू) तसेच सॅनिटायझर, मास्क तत्सम आदींसाठी दिव्यांगांना पाच टक्के निधी परत मिळावा यासाठी दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थितती
फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष नाना मोची, सचिव मुन्ना चौधरी, देवेंद्र साळी तसेच पदाधिकारी संजय वानखेडे, ललित वाचुळदे, रोहित तायडे, गणेश भारंबे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Copy