रोगनिदान शिबीरात 178 नागरिकांची केली तपासणी

0

भुसावळ । दीपनगर विद्युत केंद्रात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने 18 ते 23 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. वसाहतीमधील रुग्णालयात रोग निदान शिबिर पार पडले. या शिबिरासाठी डॉ. अंकुश कोलते, डॉ. सुदर्शन पाटील आणि डॉ.लक्ष्मीकांत नागला यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरामध्ये रुग्णांची विनामुल्य डोळे तपासणी, मधुमेह तपासणी, हृदय तपासणी तसेच रक्तदाब तपासणी करण्यात आली. यावेळी वसाहत आणि वसाहत परिसरातील 178 नागरिकांनी तपासणी करून घेतली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.पी. निकम यांनी केले. आभार भरत पाटील यांनी मानले. यावेळी अधिक्षक अभियंता एम.पी. मसराम, राजेश राजगडकर, विजय बारंगे, एम.बी. पेटकर, एम.बी. अहिरकर, सी.एन. निमजे, एन.आर. देशमुख, कल्याण अधिकारी तथा समिती कार्याध्यक्ष पंकज सनेर, जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास समिती सचिव अतुल कदम, समिती कोषाध्यक्ष सागर थोरात, समिती सदस्य एस.एम. पाटील, कैलास लोहार, एम.एम. पाटील, रामकृष्ण कारंडे, नारायण सोनवणे, अरुण शिंदे, विकास पाटील, राजेश पवार, वाय.जी. सिरसाठ, अनिकेत सोळसकर, अनिल वानखेडे, संजय देसाई, प्रदीप शेलार, वाल्मिक कवडे, बालाजी तागड, सचिन नाकड, अमोल लांबोळे यांनी परिश्रम घेतले. तर रुग्णालयातील सर्व कर्मचारीवृंद तसेच डॉ. बी.एन. पाटील आणि डॉ.जयंत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.