रेशन दुकानावर मिळणार अन्नधान्यांसह खते, बियाणे

0

मुंबई : राज्यातील सामान्य नागरिकांना नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराकडे वळवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी रेशन दुकानावरही रोकडरहित व्यवहार करता येणार आहेत. त्याचबरोबर रेशन दुकानावर अन्न धान्यासह खते आणि बियाणेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी कॅशलेसपध्दतीने ( रोकडरहित ) पैसे अदा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेचे कार्ड उपलब्ध असण्याची गरज नाही. त्याऐवजी ग्राहकांने अंगठा लावून आधारकृत बँकेच्या खात्यातून परस्पर दुकानदाराच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात येणार आहेत.
पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर सुरू होणार

रेशन दुकानावर आजपर्यंत फक्त अन्नधान्या आणि रॉकेल उपलब्ध करून देण्यात येत होते. आता त्यामध्ये बियाणे आणि खते यांचीही भर पडणार आहे. रेशन दुकानावर रोकडरहित खरेदी करण्यासाठी ग्राहकाला आपला आधार क्रमांक जोडलेले बँकखाते असने आवश्यक आहे. असे ग्राहक रेशन दुकानावर खेरदी केल्यानंतर त्याठिकाणी आपला अंगठा लावून पैसे अदा करू शकणार आहेत. त्यामुळे बँकेचे एटीएम कार्ड अवश्यक असणार नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागात एटीएम मशिन नसल्याने होणारी अडचण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसत आहे. राज्यात रोकडरहित व्यवहारासाठी सरकार प्रोत्साहन देत असून यासाठीच नव नव्या योजनांची घोषणा केली जात आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या वतीने नव्या योजनेची तयारी केली जात असून त्यासाठी प्रायोगिक तत्वावर 42 ठिकाणी ही योजना कार्यरत करण्यात येणार आहे.