Private Advt

रेशन दुकानावरील सेल्समनची आत्महत्या : भुसावळातील मुन्ना सोनवणेंविरोधात गुन्हा

यावल : भुसावळ येथील रेशन दुकानावरील सेल्समनने सोमवारी सायंकाळी आमोदा शिवारात शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटवरून भुसावळ येथील पंचशील नगरातील रहिवासी मुन्ना सोनवणे याच्याविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनवणे यांच्या धमकीला कंटाळून आत्महत्या
रेशनचे धान्य फुकटात दिले नाही म्हणून मुन्ना सोनवणेच्या धमकी व त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सागर भंगाळे यांनी फिर्याद दिल्यानुसार मुन्ना सोनवणे याने भंगाळेंना जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यास घाबरुन तसेच त्रासाला कंटाळून भंगाळे खचले होते. सतत अपमान होत असल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.