रेवतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एका आरोपीला अटक

0

बोदवड : बोदवड तालुक्यातील रेवती येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयीताला अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलगी मंगळवारी रात्री तिच्या परीवारासह घरासमोरील अंगणात खाटेवर झोपली असताना मध्यरात्री संशयीत आरोपी गणेश एकनाथ भुसारी (रा.रेवती) याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गणेश भुसारी याच्या विरोधात भादंवि कलम 354, 354 ड सह बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून बोदवडचे पोलिस उपनिरीक्षक बी.एम.मालचे तपास करीत आहेत.

Copy