रेल्वे स्थानकावर जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

0

जळगाव- मुलाच्या जावळाचा कार्यक्रमासाठी येत असलेल्या पाहुणे मंडळींना रेल्वे स्थानकावर घेण्यास गेलेल्या जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक असलेल्या चेतन संजय करोसिया वय 25 रा. वाघनगर या तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. हल्लयात चेतन गंभीर जखमी असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान हल्ला करणार्‍यांनी रात्री चेतन राहत असलेल्या वाघनगरातील परिसरात येवून बंदुकीने गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती. व शनिवारी चेतनवर प्राणघातक हल्ला केला, अशी माहिती चेतनची आत्या मनिषा सुकलाल करोसिया रा. वाघनगर यांनी दै. जनशक्तिशी बोलतांना दिली. जखमी चेतनवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे.

Copy