रेल्वे प्रवाशांना दिलासा : आठ गाड्यांना मुदतवाढ

भुसावळ : प्रवाशांची अतिरीक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारीत संरचनेसह आठ उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे.

01329/01330 पुणे-गोरखपूर विशेष गाडी
01329 पुणे-गोरखपूर विशेष गाडीच्या 25, 27 व 29 रोजी तीन फेर्‍या वाढवण्यात आल्या. 01330 गोरखपूर-पुणे विशेष गाडीच्या 24, 27, 29 व 31 रोजी चार फेर्‍या वाढविण्यात आल्या.

01331/01332 पुणे-दानापूर विशेष गाडी
01331 पुणे-दानापूर विशेष गाडीच्या 24, 28 व 31 मार्च रोजी तीन फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत तसेच 01332 दानापूर-पुणे विशेष अतिजलद गाडीच्या 25, 29 मे व 1 जून रोजी तीन फेर्‍या वाढविण्यात आल्या.

01333/01334 पुणे-दरभंगा विशेष गाडी
01333/01334 पुणे-दरभंगा विशेष गाडीची 27 मे रोजी एक फेरी वाढवण्यात आली तसेच 01334 दरभंगा-पुणे विशेष गाडीची 29 मे रोजी एक फेरी वाढविण्यात आली.

01335/01336 पुणे-भागलपूर विशेष गाडी
01335 पुणे-भागलपूर विशेष गाडीच्या 23 व 30 रोजी दोन फेर्‍या तसेच 01336 भागलपूर-पुणे विशेष गाडीच्या 25 मे व 1 जून रोजी दोन फेर्‍या वाढविण्यात आल्या.

01359/01360 मुंबई-गोरखपूर विशेष गाडी
01359 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरखपूर विशेष गाडीच्या 23, 24, 26, 28, 30 व 31 रोजी सहा फेर्‍या वाढविण्यात आल्या तसेच 01360 गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष गाडीच्या 23, 25, 26, 28, 30 मे व 1 व 2 रोजी सहा फेर्‍या वाढविण्यात आल्या.

01361/01362 मुंबई-दानापूर विशेष अतिजलद गाडी
01361 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापूर विशेष अतिजलद गाडीची 27 मे रोजी एक फेरी तसेच 01362 दानापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष अतिजलद गाडीची 28 मे रोजी एक फेरी वाढविण्यात आली.

01363/01364 मुंबई-दरभंगा विशेष गाडी
01363 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दरभंगा विशेष गाडीची 25 रोजी एक फेरी तसेच 01364 दरभंगा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष गाडीची 27 मे एक फेरी वाढविण्यात आली आहे.

01365/01366 मुंबई-छपरा विशेष गाडी
01365 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-छपरा विशेष गाडीच्या 22 व 29 मे रोजी दोन फेर्‍या वाढवण्यात आल्या तसेच 01366 छपरा -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष गाडीच्या 24 व 31 मे रोजी दोन फेर्‍या वाढवण्यात आल्या.