रेल्वे परीसरात गुरे आढळल्यास गुरे मालकांवर दाखल होणार गुन्हा

0

भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांचा स्पष्ट ईशारा

भुसावळ- रेल्वे स्थानकासह परीसरात गुरे, बकर्‍यांचा वावर वाढला असून रेल्वे परीसरातील रोपांच्या नुकसानीसह अस्वच्छता निर्माण होत असून वेळप्रसंगी गुरे रेल्वेखाली येऊन अपघाताची शक्यताही असल्याने मंगळवारपासून रेल्वे स्थानकाच्या परीसरात मोकाट फिरणार्‍या गुरांना ताब्यात घेवून गोरक्षण संस्थेत जमा केले जाणार आहे तसेच गुरांच्या मालकांविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा डीआरएम आर.के. यादव यांनी दिला आहे. सोमवारी डीआरएम यादव यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या. रेल्वे स्थानकाच्या मुसाफीरखान्यात नेहमी मोकाट गुरांचा वावर असतो. त्यामुळे स्थानकाच्या परीसरात अस्वच्छता निर्माण होते. मंगळवारपासून कारवाई केली जाणार असून स्थानक संचालक जी.आर.अय्यर यांनी कर्मचार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

Copy