रेल्वेला गर्दी : 18 उन्हाळी गाड्यांचा कार्यकाळ वाढविला

प्रवाशांचा जागेचा प्रश्‍न लागणार मार्गी : कोविड नियमांचे पालन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ : प्रवाशांची अतिरीक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारीत संरचना व विशेष शुल्कासह उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार असून, जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन करून रेल्वे गाड्यांचा कार्यकाळ वाढविला आहे.

या गाड्यांचा वाढवला कार्यकाळ
पुणे-गोरखपूर ही विशेष गाडी 5, 8, 10, 12 व 15 जून या दिवशी धावणार आहे. या गाडीच्या सात फेर्‍या होतील तसेच गोरखपूर-पुणे या विशेष गाडीच्या 5, 7, 10, 12, 14 व 17 जून या काळात सात फेर्‍या होतील. 01331 पुणे-दानापूर गाडी 7, 11 व 14 जून या दिवशी पुण्यातून सुटणार आहे. चार फेर्‍या या गाडीच्या होतील तसेच 01332 दानापूर-पुणे अतिजलद ही गाडी 5, 8, 12 व 15 जून या दिवशी दानापूर येथून सुटेल चार फेर्‍या होतील. पुणे-दरभंगा दरम्यान 01333 पुणे-दरभंगा गाडी 10 जून या दिवशी दोन फेर्‍या होतील तसेच 01334 दरभंगा-पुणे गाडी ही 5 व 12 जूनला धावेल तसेच पुणे-भागलपूर गाडी 6 व 13 जून या दिवशी धावेल. तसेच 01336 भागलपूर-पुणे विशेष गाडी 8 व 15 जून या दिवशी धावेल.

मुंबई येथून विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार
01359 मुंबई गोरखपूर गाडी 6, 7, 9, 11, 13, व 14 जून या दिवशी धावणार आहे. या गाडीच्या आठ फेर्‍या होतील. ही गाडी परतीच्या प्रवासात गोरखपूर येथून 6, 8, 9, 11, 13, 15 व 16 जून या दिवशी सुटणार आहे.
तसेच मुंबई दानापूर या विशेष गाडीच्या फेर्‍याही वाढविल्या आहे. यात 01361 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापूर विशेष अतिजलद गाडी 10 जून या दिवशी सुटणार आहे. 01362 दानापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष अतिजलद गाडी 11 जूनला सुटणार आहे. 01363 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दरभंगा विशेष गाडी 8 व 15 जूनला सुटणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी 01364 दरभंगा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष गाडी 10 व 17 जून या दिवशी चालविली जाणार आहे.

मुंबई-छपरा विशेष गाडी
01355 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – छपरा विशेष गाडी 5 आणि 12 जून या दिवशी सुटणार आहे. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील तर परतीच्या प्रवासात 01366 छपरा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अतिजलद गाडी 7 आणि 14 जून या दिवशी चालविली जाणार आहे.

मुंबई-गोरखपूर विशेष गाडी
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी 8 आणि 15 जून या दिवशी चालविण्यात येईल. या गाडीच्या तीन फेर्‍या होतील. परतीच्या प्रवासात गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 10 व 17 जून रोजी चालविण्यात येणार आहे.