रेल्वेत आता पेपरलेस तिकीट ; कागदाचा खर्च कमी करण्यावर भर

0

युटीएस अ‍ॅपद्वारे देशभरात करता येणार प्रवास ; अनारक्षित तिकीटाची सुविधा

भुसावळ- पेपरलेस कामकाजाच्या दृष्टीने रेल्वेनेही एक पाऊल पुढे टाकत रेल्वे प्रवाशांना देशभरात प्रवास करण्यासाठी युटीएस अ‍ॅप्लीकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 12 ऑक्टोबरपासून रेल्वे प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळणार असून रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटरच्या परीघात मात्र त्याचा लाभ घेता येणार नाही. मोबाईलवर प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे तिकीट (मेसेज) प्राप्त होणार असून या माध्यमातून रेल्वेच्या तिकीटासाठी लागणार्‍या कागदावरील खर्चात कपात होणार आहे शिवाय कॅशलेस व्यवहाराला या माध्यमातून चालनादेखील मिळणार आहे. भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांनी अधिकाधिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.

Copy