रेल्वेच्या धडकेत तरूण ठार

0

कासारवाडी : पुण्याच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे इंजिनची धडक बसल्याने लोहमार्ग ओलांडणार्‍या एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मयत तरुणाची ओळख अद्याप पटली नसून, त्याचे अंदाजे वय 25 आहे. या तरुणाची उंची पाच फूट पाच इंच असून तो रंगाने काळा-सावळा आहे. त्याने अंगात निळ्या रंगाची जीन्स, काळ्या पांढर्‍या रंगाचा चौकडी शर्ट, राखाडी रंगाचा बनियन, उजव्या हातावर बोकडाचे चित्र गोंदलेले आहे. गळ्यात लाल रंगाचा धागा आहे. या तरुणाविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.