रेल्वेखाली सापडून तरूणाचा पाय कापला

0

जळगाव । नांदगाव तालुक्यातील परधाडी येथे लग्न समारंभ आटोपून दापोरा येथे घरी पतरणाछया 30 वर्षीय शेंतकर्‍याचा तोल गेल्याने रेल्वेखाली सापडून उजवा पाय गमावून बसला, हाताला देखील गंभीर इजा झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

जळगाव तालुक्यातील दापोरा येथे राहणारे शेतकरी नरेंद्र जगन्नाथ सोन्ने हे कुटूंबियांसह नांदगाव तालुक्यातील परधाडी येथे नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभास गेले होते. यावेळी लग्नसमारंभ आटोपून ते दापोरा येथे घरी मुंबई-भुसावळ पॅसेंजरमध्ये परधाडी येथे बसून घरी परत येण्यास निघाले. यावेळी म्हसावद रेल्वे स्थानक परिसरात त्यांचा अचानक तोल गेल्याने सायंकाळी 4.15 वाजेच्या सुमारास ते खाली पडले. यावेळी त्यांना रेल्वे प्रवाशांनी तात्काळ आरडोओरडा करुन त्यांना जळगाव रेल्वे स्थानकावर आणले, तेथून लागलीच 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता त्यांचा उजवा पाय निकामी झाला आहे तर डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

तीन मोबाईल चोरटे लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात

जळगाव । 3 मोबाईल चोरटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लोहमार्ग पोलीसांनी गेंदालाल मिल परिसरातून ताब्यात घेतले असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.पृथ्वीराज आत्माराम सोनवणे यांचा मुलगा 13 फेब्रुवारी रोजी त्याच्या मावशीला कामायनी एक्सप्रेसने जायचे असल्याने जळगाव रेल्वे स्थानकावर सोडण्यास आला होता.त्यावेळी त्याचा मोबाईल चोरीस गेला होता. पृथ्वीराज सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.