रेमडेसिवीर बबाद जिल्हाधिकर्यांची नविन नयमावली !

जळगाव – जिल्हातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी व पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कोविड रुग्णालय संलग्न फार्मसी, मेडिकल, रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरक व कंपनीचे एजंटसला जिल्हाधिकाऱ्यांनी कही नविन आदेश दिले आहेत. ज्यात जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा काळाबाजार करण्यात येत आहे. तो रोखण्यासाठी कोविड रुग्णालयांना संलग्नित मेडिकल्समध्ये काऊंटरवर रेमडेसिविरची विक्री करू नये. रुग्णाबाबत शासनाने निश्चित केलेले सहपत्र दोन प्रतीत जतन करावे. रुग्णाला दिलेल्या रेमडेसिविरच्या रिकाम्या व्हायल्स सांभाळून ठेवाव्यात. तीन दिवस पुरेल एवढ्या इंजेक्शन साठ्याची मागणी केंद्र शासन व राज्य शासनाचा कोविड क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार नोंदवावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

कोविड रुग्णालय सुरू करण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे कोविड हॉस्पिटल म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. त्या हॉस्पिटलची दररोज जिल्ह्याच्या डॅशबोर्डवर माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले. संबंधित कोविड रुग्णालय हे शासन मान्यताप्राप्त असलेले प्रमाणपत्र, संलग्न मेडिकलचा परवान्यासह घाऊक औषध विक्रेता किंवा सी अॅण्ड एफ एजंट यांच्याकडे लेखी मागणी नोंदवावी लागेल. रजिस्टरमध्ये सुरुवातीचा साठा, पुरवठादाराचे नाव, बिल क्रमांक, खरेदी केलेला साठा, औषधाचे नाव, समूह क्रमांक, औषध पुरवठ्याचा दिनांक, रुग्णाचा तपशील, पुरवलेले इंजेक्शन, डॉक्टरचे नाव, आकारलेली किंमत आदी माहिती अद्ययावत ठेवावी. वापर, विक्री व शिल्लक साठा यांचा ताळमेळ ठेवावा.

गैरप्रकार रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवावे
कोविड रुग्णालयाने रुग्णांना औषधाची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी. काही कारणाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पूर्ण डोस देण्यात आला नाही. त्याचा उर्वरित साठा हॉस्पिटल, मेडिकलमध्ये परत करावा. त्याचे अभिलेख ठेवावे. कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवावे. रुग्णालयांमध्ये गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गैरप्रकार आढळून आल्यास रुग्णालय व्यवस्थापनास जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.