रेडक्रॉसच्या सहाव्या जेनेरीक मेडिकलचे महाबळ येथे उद्घाटन!

0

जळगाव । विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस सोसायटी सर्वांना परिचित आहेच. त्यात रकतपेढीच्या माध्यमातून तर गेल्या अनेक वर्षापासून रेडक्रॉस रक्तपेढी रुग्णांना वेळोवेळी सुरळीत रक्तपुरवठा करून जीवनदानाचे काम करीत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे ही सतत करतच राहणार आहे. जेनेरीक औषधांच्या प्रचार व प्रसारात ही रेडक्रॉसने गेल्या दोन वर्षात खूप चांगले कार्य केले आहे. जेनेरीक औषधांचा प्रचार व प्रसार व्हावा, गरीब रुग्णांना चांगल्या डॉक्टरांकडून कमी खर्चात चांगले उपचार मिळावे यासाठी जेनेरीक मेडिकल दुकान, दवाखाना ही सुरू करण्यात आला.

शहरातील सहावे जेनेरीक मेडिकल
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या पुढाकाराने महाबळ रोड येथे सहाव्या जेणेरीक मेडिकल ऐश्वर्या जेनेरीक मेडिकल स्टोअर्स व दीर्घायु जेनेरीक सेवा दवाखान्याचे उद्घाटन शनिवारी महाबळ रोड येथील साची अपार्टमेंट, भारत गॅस समोर, करण्यात आला. या उद्घाटक म्हणून महावीर बँकेचे चेअरमन दलूभाऊ जैन हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर किशोर पाटील, नगरसेविका अश्विनी देशमुख, नगरसेवक नितिन बरडे व किशोर भोसले, विनोद देशमुख, प्रा. शेखर सोनाळकर उपस्थित होते.

सामान्य नागरिकांना फायदा
प्रास्ताविक जेनेरीक समितीचे चेअरमन प्रा. शेखर सोनाळकर यांनी केले. अश्विनी देशमुख यांनी शुभेच्छा देताना संगितले की, जळगाव शहरात दवाखाना व औषधिंमुळे सर्व सामान्य जनतेचे खूप हाल होतात व परिस्थिती नसताना ही अवास्तव खर्च करावा लागतो. या अशा वेळी रेडक्रॉसने सुरू केलेली ही जनसुविधा सुरू केली हे खूप कौतुकास्पद असल्याचे मत किशोर पाटील यांनी व्यक्त केले.

छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात सेवा सुरू करा
नितिन बरडे यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात ही सेवा रेडक्रॉसने उपलब्ध करून द्यावी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन व आभार रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी मानले.
यावेळी दलभाऊ जैन, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनीया यांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी जेनेरीक दीर्घायु दवाखान्यात सेवा देणार्‍या डॉ. महाजन यांचा आणि मेडीकलचे प्रोपरायटर श्रीकांत महाले यांचा सपत्नीक रेडक्रॉसच्या वतीने सत्कार करण्यात आला.