रेझींग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅली

0

जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे सोमवारी 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन (रेझींग डे) साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने पोलीस दलातर्फे सकाळी 9 वाजता शहरातून सुरक्षित वाहतुक विषयक जनजागृतीपर शालेय विद्यार्थी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन असल्यामुळे जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कळविली आहेत. यातच सोमवारी वर्धापन दिनानिमित्त शहरात जनजागृतीपर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार असून या रॅलीतून विद्यार्थी जळगावकरांना सुरक्षित वाहतूक या विषयावर जनजागृती करणार आहेत. रॅलीत सुमारे शहरातील 10 विद्यालयांमधील 800 विद्यार्थी सहभागी होणार असून त्यात विविध जनजागृतीपर पोस्टरद्वारे नागरिकांना सुरक्षित वाहतुकीचा वाहतूकीचा संदेश विद्यार्थी देणार आहेत. रॅलीची सुरूवात शहर वाहतुक शाखा कार्यालयापासून हाईल. त्यानंतर ला.ना.शाळा, कोर्ट चौक, टॉवर चौक मार्गे चित्रा चौक, नविन बस स्थानक या मार्गाने जावून शहर वाहतुक कार्यालयात रॅलीची सांगता हाईल.