रेकॉर्ड ब्रेक कोरोना! २४ तासात २ लाख नवीन रुग्ण

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाने आज वरचे सगळेच विक्रम मोडले आहेत. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे 2,00,739 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,038 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1,40,74,564 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 73 हजारांवर पोहोचला आहे. देशभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. तरीही रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून ‘रेकॉर्ड ब्रेक’ आकडेवारी समोर येत आहे.