रूग्णांना फळ वाटप

0

नवापूर । नवापूर शहरात तिथि प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली त्या निमित्त सरकारी दवाखान्यात फळवाटप करण्यात आले यावेळी मोठया संख्येने युवा वर्ग उपस्थित होते. युवा कार्यकर्ता रोहन पवार यांच्या सौजन्याने सरकारी दवाखान्यात गरजू लोकांना तसेच रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

किसन कोळी,कुणाल नरभवर,रत्नाकर पवार,दिनेश भोई,दीपेश भोई,बबु भोई,मयुर,सोम,दादु चौधरी इत्यादि शिवभक्त उपस्थित होते.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश मावची तसेच सरकारी दवाखान्यातील सर्व स्टाप उपस्थित होता.