‘रुबेला’ जनजागृतीकरिता घेतली पालकसभा

0

लोणावळा : रुबेला व गोवर या लसींबाबत जनजागृती व माहिती देण्याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने शाळांमध्ये पालकसभा घेत माहिती देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 0 ते 15 वयोगटातील मुला मुलींना ही लस देण्यात येणार आहे. येत्या 14 नोव्हेंबर रोजी राज्यात या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. या लसी विषयी पालकांना माहिती देण्याकरिता लोणावळा नगरपरिषद आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील शाळांमध्ये पालकसभा घेत माहिती देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य सहाय्यक डी.बी.ठोेंबरे यांनी दिली.

काळे कॉलनी येथील वैद्यकीय अधिकारी एम.एस. वांगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठोंबरे, आरोग्य सेविका श्‍वेता कांबळे, रुपाली मोहिते या शाळांमध्ये जाऊन रुबेला लसीबाबतची माहिती देत आहेत. पल्स पोलिओ प्रमाणेच भारत देश हा गोवर व रुबेला मुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला असून त्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही रुबेला लसीकरण मोहीम हाती घेतली आहे

Copy