रुद्र दांडेचे 67 चेंडूत द्विशतक!

0

मुंबई । मुंबईच्या माटुंगा जिमखाण्यामध्ये खेळल्या गेलेल्या स्कूल लीगमध्ये 19 वर्षाच्या रुद्र दांडेने अवघ्या 67 चेंडूमध्ये नाबाद 200 धावा करत इतिहास रचला आहे. मुंबई क्रिकेट एसोसिएशन द्वारा आरोजित आबिस रिजवी ट्रॉफी सुपर-8 कॉलेज टी-20 टूर्नामेंटमध्ये रिजवी आणि पी डालमिरा कॉलेजमध्ये हा सामना खेळला गेला. या सामन्यात 21 चौकार आणि 15 षटकार ठोकत रूद्रने विक्रम रचला आहे.

फक्त 39 चेंडूमध्ये रुद्रने शतक ठोकले. आंतरराष्ट्रीर स्तरावर श्रीलंकेमध्ये धानुका पाथिराणाने 2007 मध्ये लंकाशाररसाठी खेळतांना 72 बॉलमध्ये 277 रन्स केले होते. दांडेच्या या खेळीने रिजवी कॉलेजने 20 षटकांमध्ये दोन विकेट गमवत 322 रन्सचा डोंगर उभारला.