रुईखेड्यात बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

Fake Country Liquor Factory Started Behind Poultry Farm In Ruikheda : Three Suspects Nabbed मुक्ताईनगर : तालुक्यातील रूईखेडाजवळ बनावट देशी दारू बनवणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकत तिघांच्या मुसक्या बांधल्या तर मूख्य सूत्रधारासह दोघे पसार झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. अटकेतील संशयीतांना भुसावळ न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

रेकी केल्यानंतर मध्यरात्री कारवाई
मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेडा येथे बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून रेकी सुरू करण्यात आली. मंगळवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्‍यांच्या पथकाने अचानक जाऊन छापा टाकत दिडशे बॉक्समधील तयार दारू, रीकाम्या बाटल्या, बूच आदी मिळून 17 लाख 43 हजार 36 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली तर मुख्य सुत्रधारासह दोघे पसार झाले आहेत.