Private Advt

रुईखेड्यात जुगाराचा डाव उधळला : सात जुगारी जाळ्यात

मुक्ताईनगर : तालुक्यातील रूईखेडा येथे झन्ना-मन्ना खेळतांना सात जुगार्‍यांना पकडण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगारासह 14 हजार 230 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना तालुक्यातील रुईखेडा गावात सार्वजनिक जागेत जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर, पोलिस नाईक अविनाश पाटील, विजय पढार, लतीफ तडवी यांच्या पथकाने धाड टाकून रूईखेडा येथून सात जुगार्‍यांना ताब्यात घेतले. बुधवार, 16 मार्च रोजी रात्री अकरा वाजता ही कारवाई करण्यात आली.

या जुगारींना केली अटक
पोलिसांनी सुनील विलास वराडे, गजानन त्र्यंबक वराडे, अनिल शामराव लोखंडे, गोपाळ सोपान पाटील, राजाराम गणु लोखंडे, अशोक रामा सरोदे, शालिक सलीम वंजारी (रा.रुईखेडा) यांना अटक केली असून संशयीतांकडून जुगाराचे साहित्य व अंगझडतीत 14 हजार 230 रुपयांची रोकड जप्त केली आहे. रवींद्र धनगर यांच्या फिर्यादीवरुन वरील सात जुगारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान,
तालुक्यातील घोडसगाव येथे 60 लिटर मोहाची व चार हजार 800 रुपये किंमतीची दारू बाळगतांना सुकदेव अटकाळे आढळल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.