रीक्षा चालकाचा मोबाईल लांबविला : जळगावातील घटना

जळगाव : शहरातील नेरीनाका लक्झरी बसस्थानकातून एकाचा 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईल लांबवण्याचे प्रकार वाढले
फारूख हलीम पटेल (56, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) हे रीक्षा चालक आहे. मंगळवार, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास रीक्षा घेवून नेरी नाका जवळील लक्झरी स्थानकाजवळ त्यांनी रीक्षा लावली होती. यावेळी एकाने रीक्षात घर सामान भरण्यासाठी दोन जणांना बोलावितो, असे सांगून रीक्षा मागे घेण्यास सांगितले असता फारूख पटेल यांचा 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला. मोबाईल चोरी गेल्या प्रकरणी रीक्षा चालक यांनी शनीपेठ पोलिसात रात्री 8 वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार परीष जाधव करीत आहे.