रीक्षा उलटल्याने शेतमजुर महिलेचा मृत्यू : 12 प्रवासी जखमी

0

रावेर : तालुक्यातील केर्‍हाळा खुर्द गावानजीक भरधाव रीक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू झाला तर 12 महिला प्रवासी जखमी झाले. बुधवार, 8 रोजी सकाळी 10 वाजता हा अपघात झाला. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रीक्षा चालक प्रवीण महाजन हा रीक्षा (एम.एच.19 एएक्स 7674) मधून शेतात शेतमजूर महिलांना घेवून जात असताना केर्‍हाळा खुर्दकडून रसलपुरच्या दिशेने येतांना भोकर नदीच्या पुलाजवळ रीक्षा पलटल्याने कमलबाई धर्मा निकम (50) ही महिला जागीच ठार झाली तर कौशल्याबाई भालेराव, कमलाबाई निकम, उषा अटकाळे, नफीसा तडवी, मीरा तडवी, फातेमा तडवी, जेवरा तडवी,सुबनूर तडवी,नुसिर तडवी देवराबाई तडवी,सोनी तडवी,शबाना तडवी (सर्व रा.केर्‍हाळा) या जखमी झाल्या. जखमींवर रावेर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.