रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्नात गुणारत्ने जखमी

0

सिडनी। क्रिकेटमध्ये बेफाम फटके मारण्याचे धाडस फलंदाजांच्या अंगलट येऊ शकतो. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-20 सामन्यात गुणारत्नेवर असाच प्रसंग ओढावला. ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात गुणारत्नेला चेंडू लागला.

चेंडू लागल्यानंतर श्रीलंकेचा फलंदाज गुणारत्ने जागीच कोसळला. गुणारत्ने चेंडू लागल्यानंतर खूप कळवळला. पुन्हा उठून उभा राहण्याचा त्याने प्रयत्न देखील केला, पण तो दुखापतीमुळे पुन्हा खाली कोसळला. सामन्याच्या 16 व्या षटकात हा प्रकार घडला. फॉकनरच्या पहिल्याच चेंडूवर गुणारत्नेने डीप थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मिळविण्यासाठी रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. फॉकनरचा चेंडू गुणारत्नेला लागला आणि तो कळवळला. दुखापतीनंतरही गुणारत्नेने हार न मानता 37 चेंडूंमध्ये 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून संघाला विजयश्री प्राप्त करून दिला. गुणरत्नेला झालेली दुखापत गंभीर असल्याचे पाहून काही वेळाने सर्वांनी त्याच्याजवळ धाव घेतली होती. काही वेळाने गुणारत्नेने स्वत:ला सावरून पुन्हा फलंदाजीला सुरूवात केली.