रिक्षा चालक-मालकांचे उद्या आरटीओ कार्यालयावर आंदोलन

0

ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे बाबा कांबळे यांची माहिती

पिंपरी चिंचवड : राज्यातील रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील आरटीओ कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 27) आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणला जाणार असल्याची माहिती ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी दहा वाजता आणि पुणे आरटीओ कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे आरटीओ अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

अशा आहेत रिक्षा संघटनेच्या मागण्या…

रिक्षा चालक-मालकांसाठी परिवहन खात्याअंतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. ओला आणि उबेरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करण्यात यावी. इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावेत. मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात यावा. प्रत्येक आरटीओ कार्यालयात 250 मीटरचा पासिंग टॅ्रक उभारावा. नवीन रिक्षाची ब्रेक टेस्ट बंद करण्यात यावी, यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात, यासाठी मंगळवारी (दि. 27) राज्यातील सर्वच आरटो कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वच जिल्ह्यात आंदोलन तिव्र होणार असून मागण्या मान्य न झाल्यास रिक्षा बंद सारखे आंदोलन सातत्याने करण्यात येईल, असाही इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.

Copy