रिक्षा चालकांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करणार: आमदार अण्णा बनसोडे

0

पिंपरी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसत असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान पिंपरी येथील रिक्षा चालकांच्या अन्नधान्याची व्यवस्था करणार असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे. जेवणाचे किट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी येथे अन्न छत्र सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी दररोज दोन हजार व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. आमदार अण्णा बनसोडे यांनी रिक्षा चालकांशी चर्चा करून त्यांची विचारपूस केली. त्यांची व्यथा समजून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

रिक्षा चालकांना पाच हजार रुपये मानधन मिळावे अशी मागणी होत असल्याने याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले आहे.

Copy