रिक्षाची धडक; दोन जण जखमी

0

जळगाव । शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या सिग्नलवर रविवारी सायकलवरील लहान मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षाची समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी झाले. रेल्वे स्थानकावर नातेवाईकांना सोडून शेख जावेद शेख करीम हा त्याच्या रिक्षाने घराकडे जात होता.

सायंकाळी शिवाजीनगर उड्डाण पुलाजवळ असलेल्या सिग्नलजवळ काही लहान मुले सायकल चालवत होते. अचानक समोर आलेल्या सायकलवरील मुलांना वाचविताना जावेद शेख याने रिक्षा वळविवताच दुचाकीला धडक दिली.