रिक्षाची ट्रक्टरला धडक आठ जण जखमी

0

पाचोरा । पाचोरा-शेंदुर्णी रस्त्यावर भररस्तावर उभे असलेल्या ट्रँक्टरला मागावुन येणार्‍या रिक्षाची जोरदार धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना शेंदुर्णी-वरखेडी दरम्यान असलेल्या मालखेडा या गावाजवळ झाला. शेदुर्णीहुन प्रवाशी रिक्षात जवळपास आठ प्रवाशी पाचोर्‍याकडे येत होते. रस्त्यावर ट्रक्टरचे डिझेल सपंले असल्याकारणामुळे रस्त्याच्या बाजूला उभे असलेले ट्रँक्टर क्रमांक (एमएच-19, एएफ-5592) ला मागावुन येणार्‍या रिक्षा क्रमांक (एमएच-20,टी-4629)ने मागावुन धडक दिली. यात 8 जण जखमी झाले. या अपघातात महेन्द्र मराठे, सांडु आहेचे, मन्यार बबलु, मगंला आकोदे, कुमार आकोदे यांच्यासह काही नावे उपचारासाठी शेंदुर्णीकडे गेल्याने नावे मिळु शकले नाही. अपघातग्रस्तांना पत्रकार दिलिप जैन व परिसरातील ग्रामस्थांनी मदत केली. टँक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला. शेंदुर्णी ते वरखेडी दरम्यान मालखेडा गावाजवळ हा अपघात घडला.