राहुल गांधी परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेले; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य

0

भोपाळ:- भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. दरम्यान भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना “परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही” असे वादग्रस्त विधान केले आहे.

तसेच आचार्य चाणक्य यांनी फक्त भुमिपूत्रच आपल्या मातृभूमीचे रक्षण करु शकतो असे सांगितलं होतं असेही त्यांनी सांगितले. भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यावेळी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला. “काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश काँगेस प्रवक्ता जे पनी धनोपिया यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मानसिक तोल ढासळला असल्याचे म्हटलं आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना पहायला मिळणार आहे.

Copy