राहुल गांधीनी मला पाकिस्तानमध्ये जाण्यास सांगितलं नाही – सिद्धू

0

चंदीगड : राहुल गांधी यांनी मला पाकिस्तानात जाण्यास कधीच सांगितलं नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वैयक्तिक निमंत्रणावरून मी पाकिस्तानात गेलो होतो. हे जगाला माहिती आहे, असं घुमजाव काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं आहे. सिद्धू यांनी ट्विटरद्वारे असं स्पष्टीकरण दिलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानात जाण्यास सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट सिद्धू यांनी बंगळुरू येथील एका पत्रकार परिषदेमध्ये केला होता. राहुल गांधी माझे कॅप्टन असून त्यांच्या सांगण्यावरून मी सगळ्या ठिकाणी जात होतो, असं सिद्धू यांनी  म्हटले होते. वास्तविक पाहता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानात जाण्यापासून मला रोखले होते. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि नेत्यांनी आग्रह केल्यावर मी पाकिस्तानात गेलो, असं सिद्धू यांनी सांगितलं होतं. दरम्यान, करतारपूर कॉरिडॉरच्या भूमिपूजनापासून सुरू झालेला हा वाद अजूनही संपताना दिसत नाही.

Copy