राहुलच्या खेळीने पुण्याचा विजय

0

कोलकाता। सलामीवीर राहुल त्रिपाठीच्या अवघ्या 52 चेंडूत 9 चौकार व 7 उत्तूंग षटकारांसह 93 धावांची तडफदार खेळीच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने आयपीएल-10 हंगामातील साखळी सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्सला 4 गडी राखून मात दिली.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कोलकाताने निर्धारित 20 षटकात 8 बाद 155 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने 19.2 षटकात 6 बाद 158 धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले. एकीकडे, रायझिंग पुणे संघासाठी हा सलग तिसरा विजय ठरला तर दुसरीकडे, कोलकाता संघाला येथे सलग दुसऱया पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह पुणे संघाने हैदराबादला पिछाडीवर टाकत गुणतालिकेत तिसरे स्थान प्राप्त केले.