Private Advt

राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार!

चाळीसगाव: शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना सोमवार रोजी दुपारी चाळीसगाव जवळील हॉटेल हरभोले समोर घडली.

              याबाबत अधिक माहिती अशी की, चरणदास गणपत चव्हाण (वय- ४८ रा. तळोंदा ता. चाळीसगाव) हा वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. चरणदास हा बि- बियाणे घेण्यासाठी दुचाकीवर (क्र. एम.एच. १९ एफ- ३१३३) चाळीसगावाकडे जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. हि घटना राष्ट्रीय महामार्ग २११ वरील हरभोले हॉटेलसमोर सोमवार रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.  अपघात घडताच वाहनधारक हा पसार झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच लागलीच पीएसआय भागवत पाटील, पोहेकॉ शामकांत सोनवणे, पोलिस नाईक सोनार, गणेश पवार, नितीन अघोने व चालक काळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पीएसआय भागवत पाटील यांनी लागलीच रूग्णवाहिका बोलावून प्रेताला ग्रामीण रूग्णालयाकडे रवाना केले आहेत. मयत चरणदास यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहेत.