राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी रस्ता रोको

0

राष्ट्रीय महामार्गावरील कपिलवस्तूनगर महामार्ग ठप्प : आंदोलकांची घोषणाबाजी

भुसावळ- जळगाव ते चिखली महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान अनेक अनेक अटी-शर्तींचा भंग केला जात असून निकृष्ट काम करणार्‍यांवर कारवाई करावी तसेच या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील कपिल वस्तूनगरजवळ रास्ता रोको करण्यात आला. तब्बल 15 मिनिटे चाललेल्या या आंदोलनानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मागण्यांसंदर्भात प्रांताधिकारी प्रशासनालाही निवेदन देण्यात आले.

चौपदरीकरण कामात अटी-शर्तींचा भंग
महामार्गाचे चौपदरीकरण करताना अनेक अटी शर्तींचा भंग करण्यात आला आहे. पाझर तलाव तयार करून त्यातील मुरूम व दगडाचा वापर करणे बंधनकारक केले असताना स्थानिक प्रशासनाशी हातमिळवणी करून सरकारी गटारवरील मोठ-मोठे डोंगर भुईसपाट केले जात आहे. नवीन रस्त्यासाठी सहा ते सात फूट खाली भराव करणे गरजेचे असता काळी-पिवळी माती टाकून भराव केला जात आहे शिवाय परप्रांतीयांना रोजगाराची संधी देण्यात आली असून कामगार अधिकार्‍यांना याची कल्पना देण्यात आली नाही तसेच स्थानिकांना यात रोजगार देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

यांचा आंदोलनात सहभाग
जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, शरद सोनवणे, सुदाम सोनवणे, प्रकाश निकम, बाळू सोनवणे, राजा लाहोरीया, शे.हबीब शै.असगर, प्रकाश सोनवणे, युसूफ शेख, प्रकाश तायडे, दिलीप मोरे, बंडू देशमुख, रीतेश सोनवणे, शरद जोहरे, प्रमोद पवार, शुभम बेहरे, शेख आसीफ यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाची दखल न घेतल्यास चक्का जाम आंदोलनाचा ईशाराही सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Copy