राष्ट्रीय परिषदेसाठी शोध निंबध पाठविण्याचे आवाहन

0

जळगाव : मूळजी जेठा महाविद्यालयातील जनसंवाद आणि वृत्तविदया विभागातर्फे माध्यमे आणि सामाजिक बदल या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून 5 जानेवारीपर्यंत शोधनिबंध मागविण्यात आले आहे. महाविदयालयात प्रथमच मीडीयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय परीषद होणार आहे. ही परिषद 30 व 31 जानेवारी 2017 रोजी आयोजीत करण्यात आली असून परिषदेचे उद्घाटन 30 रोजी सकाळी 9.00 महाविदयालयातील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार आहे. यात जयपूर, भोपाळ, दिल्ली, हैद्राबाद आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांचे प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. ही दोन दिवसीय परिषद चार सत्रात होणार आहे.

शोध निबंधांवरील पुस्तक प्रकाशन
मिडीया आणि तरूण, महिला आणि माध्यमे, माध्यमे आणि सामाजिक बदल, जाहिरात आणि सामाजिक बदल, उदयोगसमूह आणि सामाजिक जबाबदारी तसेच माध्यमे आणि समाज हे विषय चर्चिले जाणार आहेत. परिषदेत सहभागी अभ्यासकाकडून प्राप्त शोध निबंधावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात येणार आहे. यासाठीअभ्यासकाकडून शोध निबंध मागविण्यात आले असून त्याची अंतिम मुदत 5 जानेवारी 2017 आहे. शोधनिबंध इंग्रजी, हिंदी किंवा मराठी अशा तिन्ही भाषेत पाठवू शकतात. शोधनिबंधाची मर्यादा 3000 शब्दापर्यंत आहे. परिषदेत सहभाग नोंदविण्यासाठी विभागप्रमुख प्रा.विनोद निताळे यांच्याशी 9860046706 वर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले आहे.