राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी अभय कोळीची निवड

0

भुसावळ : टेनिस क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने केरळ टेनिस क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राष्ट्रीय 14 वर्षाआतील टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी अभय कोळी यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच नंदुरबार येथे पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत अभयने नेत्रदिपक कामगिरी केली होती. स्पर्धेत अभयने 8 गडी बाद केले होते. स्पर्धा केरळमधील अंगमली येथे 27 ते 31 डिसेंबर दरम्यान होणार असून त्याकरीता अभय रवाना झाला आहे. या निवडीबद्दल प्रा. आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार संजय सावकारे, आमदार शिरीष चौधरी, राज्य संघटनेचे संजय होळकर, मयुर ठाकरे, जिल्हा सचिव वासेफ पटेल, सचिन शिंदे, डॉ. प्रदिप तळवेलकर, राजेश जाधव यांनी कौतुक केले. राहुल कोळी यास प्रतिक कुळकर्णी व खुशाल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.