राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भुसावळ संघ प्रथम

0

भुसावळ । विरार मुंबई येथे राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रत्येक राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये भुसावळ संघाने 6 सुवर्ण व 5 सिल्व्हर मेडल व प्रो-बेल्टसह 10 हजार रुपये रोख रक्कम मिळविली. या संघामध्ये सुदेश पाठक यानेे सुवर्ण पदक, साहिल बग्गन सुवर्ण पदक, सानिया बग्गन सुवर्ण, सचिन बुंदेले सुवर्ण, दामिनी बुंदेले, रुचिता खरे, राकेश अगरकर सिल्व्हर पदक, कृतिका आठवले सिल्व्हर, अर्पिता भालेराव सिल्व्हर, अभिषेक निकम सिल्व्हर, अक्षदा बिर्‍हाडे सिल्व्हर, तन्वीर अहमद निसार काझी, राकेश सपकाळेे याने प्रो-बेल्टसह 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.

प्रशिक्षक शेजवळ यांचा केला गौरव
प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ यांना संघाची ट्रॉफी देवून त्यांचा गौरव करण्यात आला. सर्व खेळाडूंचे एनआरएमयु मंडळ सचिव इब्राहिम खान, रवी भालेराव, सुनिल निकम, रवी चौधरी, दिलीप तळेकर, रुपेश गायकवाड, विजय साळवे, रमेश साळवे, सुरेश यशोदे, दिपक मगर, राकेश बग्गन, किशोर चावरिया यांनी कौतुक केले आहे.