राष्ट्रीय कार्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज

0

शहादा:कोरोनाशी लढा देण्यासाठी शहादा शहरातील सामाजिक संस्था आपला हातभार लावत आहे. रक्तदान हे महान पवित्र कार्य आहे.राष्ट्रीय कार्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.ज्ञानी कुलकर्णी, डाॅ.हेमंत सोनी यांनी केले.

शासकीय नियमांचे पालन करून आणि सोशल डिस्टंसिंग पाळून, शहाद्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिन व गुरु हरगोविंदसिंह जयंती निमित्त शहादा शहरातील सन्मित्र बहुउद्देशीय क्रीडा मंडळ, वैश्य सुवर्णकार समाज मंडळ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, सरदार वल्लभभाई पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक चौकातील सुवर्णकार मंगल कार्यालयात रक्तदानाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व गुरु हरदास सिंग, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली.

अल्पावधी काळात रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाज माध्यमाद्वारे प्रचार व प्रसार करून प्रत्यक्ष मोबाइलद्वारे संपर्क साधून शिबिराला 51 रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला. आजूबाजूच्या खेड्यांतील कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला आणि शिबीर यशस्वी केले.

यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विनोद सोनार, सन्मित्र बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, नगरसेवक संजय साठे, अजय शर्मा, मनीष चौधरी, सुवर्णकार युवा मंडळाचे अध्यक्ष अमित सोनार, डॉ. हेमंत सोनी, सामाजिक कार्यकर्ते पंकज सोनार, ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र सोनार, सन्मित्रचे संपत कोठारी, आर.टी. पाटील, भरत पाटील, विविध युवा मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. याप्रसंगी महिलांही सहभाग नोंदवून रक्तदान केले.

होमिओपॅथीच्या औषधी गोळ्याचे वाटप

शिबिरात कोरोना प्रतिबंधासाठी होमिओपॅथीच्या औषधी गोळ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आणि मास्कचे सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे वाटप करण्यात आले. नंदुरबार येथील जन कल्याण ब्लड बँकेच्या डाॅ.लालचदानी, राजेन्द्र वाघ, प्रकाश भोई, खलील काझी, विशाल वाढळे, सुर्यवंशी, रोहित शिंदे, आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Copy