राष्ट्रीयकृत बँकेत ज्येष्ठांसाठी स्वतंत्र व्यवस्थेची मागणी

0

रावेर : राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी ज्येेष्ठ नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ओंकारेश्‍वर ज्येष्ठ नागरीक सेवाभावी संस्थेतर्फे तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संस्थेच्यावतीने तहसिलदारांची भेट घेण्यात येवून ज्येष्ठ नागरिकांना बँकेत आर्थिक व्यवहार करतांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत आपल्या समस्या मांडण्यात आल्या. या निवेदनावर डॉ. एस.आर. पाटील, रामदास चौधरी, सुभाष महाजन, शामराव चौधरी, दयाराम मानकरे, काशिनाथ रायमळे, सुपडू मानकरे, नारायण दामोदरे, यादवराव पाटील, लक्ष्मण कराद, प्रकाश पाटील, कडू चौधरी, भगवान बारी, भागवत वाघ, श्रीराम पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहे.