राष्ट्रवादी सोशल मिडिया अध्यक्षपदी शेडगे

0

कामशेत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुका सोशल मिडिया अध्यक्षपदी संजय शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते. शेडगे हे राष्ट्रवादीचे क्रीयाशिल कार्यकर्ते असून ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे सरचिटणीस आहेत.