राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षपदी निलेश देशमुख यांची नियुक्ती

0

अमळनेर । शहरातील पवन चौक भागातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश चंद्रशेखर देशमुख यांची अमळनेर शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याची ही निवड शहरध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी केली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असुन त्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मोफत सेवा पुरवित समाजकार्य करणारे युवा कार्यकर्ते असल्याने त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करणेबाबत माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या सुचनेनुसार नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील, विक्रात पाटील, मुक्तार खाटीक, भागवत पाटील, सचिन पाटील, योजना पाटील, आरिफ पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.