Private Advt

राष्ट्रवादी पदाधिकार्‍याला अपमानास्पद वागणूक : रावेरात आमदारांनी केली पोलिसाची झपाई

रावेर : रावेर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलिसांनी पकडलेले विना क्रमांकाचे ट्रॅक्टर सोडवण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या एका पंचायत समितीच्या माजी सदस्याला पोलिसांनी अपमास्पद बोलून हाकलून दिल्याची घटना शहरात घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकारानंतर हतबल सदस्याने घटनाक्रम आमदार शिरीष चौधरी यांच्या कानावर टाकल्यानंतर आमदारांनी पोलिस ठाणे गाठून त्या पोलिसाची चांगलीच झपाई केली. ाया प्रकाराची शहरात चांगलीच चर्चा रंगली.

आमदारांनी केली पोलिसाची झपाई
रावेर शहरात नेहमीप्रमाणे पोलिसांकडून नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करीत असताना रावेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व पंचायत समितीचे माजी सदस्य यांच्या कार्यकत्यार्ंचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडल्यानंतर ते सदस्यासाठी सदस्य पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घालत अपमानास्पद वागणूक दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण करतात म्हणून धमकी सुध्दा दिली. या प्रकारानंतर हताश झालेले सदस्य आल्या पावली माघारी फिरले व त्यांनी सर्व घटनाक्रम आमदार शिरीष चौधरी यांना कथन केला. आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर पोलिस स्टेशनमध्ये येऊन संबधित पोलिसांची चांगली झपाई केली. यावेळी डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख उपस्थित होते.

हातगाड्यांना पर्यायी जागा द्या : आमदार
रावेर शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पोलिस व नगरपालिकेने रावेर शहरातील हातगाड्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्याधिकारी स्वालिया मालगावे यांच्याशी संवाद साधत जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली तसेच या संदर्भात लवकरच बैठक घेण्याची सूचनाही केली.